नगरपरिषद निवडणूक -२०२५ अनुषंगाने तुळजापूर काँग्रेसची भव्य आढावा बैठक उत्साहात पार
काँग्रेस संघटना बळकटीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत्या...
नगरपरिषद निवडणूक -२०२५ अनुषंगाने तुळजापूर काँग्रेसची भव्य आढावा बैठक उत्साहात पार
काँग्रेस संघटना बळकटीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत्या…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे २९ ओक्टोंबर रोजी शारदा मंगल कार्यालय, तुळजापूर येथे भव्य दिव्य काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

या बैठकीस माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू कट्टर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, जनसेवक अमोल कुतवळ, शहराध्यक्ष भारत कदम, माजी नगरसेवक अमर मगर,अशोक इंगळे, नितीन पाटील, नागनाथ भांजी, रसूल बागवान, श्रीकांत धुमाळ, रंजीत इंगळे, आनंद जगताप, सुदर्शन वाघमारे, व बालाजी तट आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

बैठकीदरम्यान शहर काँग्रेस संघटना बळकटीसाठी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले. त्यात – अल्पसंख्याक शहराध्यक्ष म्हणून युसूफ नजीर शेख,ओबीसी सेल शहराध्यक्ष श्रीकांत मोहनराव रसाळ,युवक शहर उपाध्यक्ष ओंकार संतोष लोंढे,मागासवर्गीय युवक शहराध्यक्ष प्रमोद काकासाहेब कांबळे, युवक शहर संघटक गणेश विजयकुमार अमृतराव, अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष अब्दुल वहाब नजमुद्दीन शेख, शहर संघटक संजय हरिश्चंद्र सजन बैठकीत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनिती आखण्यात आली असून, तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस परिवार एकदिलाने सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.▪️जनतेचा विश्वास- काँग्रेसचा निर्धार!




