Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत नवा ट्विस्ट! ७ जणांची माघार, राजकीय डावपेच उघड

0 6 7 8 4 1

तुळजापूर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत नवा ट्विस्ट! ७ जणांची माघार, राजकीय डावपेच उघड

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून, दि.२२ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच राजकीय हालचालींना वेग आला असून, दि.२४ जानेवारी २०२६ रोजी सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अर्ज माघारीमुळे अनेक गटांचे गणित बदलले असून, काही ठिकाणी थेट लढतीचे संकेत मिळू लागले आहेत. अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांमध्ये – सौ. देडे मनीषा कल्याण घाटंग्री (अपक्ष),नरेश गणेश सिद्राम – अंदूर (यशवंत सेना),व्हंदारणे गोविंद गुंडेराव सलगरा दिवटी (अपक्ष),डोंगरे सोनाली किरण – मंगरूळ (अपक्ष),कानडे रूपाली जितेंद्र – अंदूर (अपक्ष),गुड्ड विशाल वसंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),शेटे विशाल वैजनाथ – अंदूर (इंडियन काँग्रेस)यांचा समावेश आहे.
या माघारीमुळे काही मतदारसंघांत मोठ्या पक्षांना थेट फायदा, तर काही ठिकाणी बंडखोरांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उरलेल्या उमेदवारांमध्ये आता प्रचाराला वेग येणार असून, निवडणूक रणधुमाळी आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.२७ जानेवारीनंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, तुळजापूर तालुक्यातील राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे