Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस भरती पारदर्शक, निष्पक्ष; दलालांना बळी पडू नका – पोलीस अधीक्षक रितु खोखर

पोलीस भरती पारदर्शक, निष्पक्ष; दलालांना बळी पडू नका – पोलीस अधीक्षक रितु खोखर

0 7 6 4 8 6

पोलीस भरती पारदर्शक, निष्पक्ष; दलालांना बळी पडू नका – पोलीस अधीक्षक रितु खोखर

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देताना पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी स्पष्ट केले की, सदर भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषांना, दलालांना, मध्यस्थांना किंवा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलीस भरतीमध्ये अनधिकृत मदत, शिफारस किंवा पैसे देऊन निवड मिळवून देणे शक्य नाही. अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले. तसेच, शारीरिक चाचणीपूर्वी किंवा दरम्यान स्टेरॉइड्स, कार्यक्षमता वाढवणारी औषधे, अंमली किंवा प्रतिबंधित पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे पदार्थ सेवन केल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारास तात्काळ अपात्र ठरवून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
उमेदवारांनी मैदानावर येताना स्पोर्ट्स शूज किंवा रनिंग शूज घालावेत. मैदानास अपायकारक असलेले स्पाईक शूज वापरण्यास सक्त मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.भरती प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक इव्हेंटसाठी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, प्रत्येक हालचालींची नोंद ठेवली जाणार आहे. कोणतीही अनुचित घटना, गैरप्रकार किंवा नियमभंग आढळल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जाईल.भरतीसंदर्भात काही संशयास्पद बाबी आढळल्यास किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष, धाराशिव येथे मोबाईल क्रमांक 7588527620 किंवा 2472-222900 वर संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे