Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाले आमदार तानाजी सावंत;यात्रा मैदानाचा मार्ग लवकरच मोकळा – मंदिरातच दिला शब्द

मंदिरात दर्शन, बाहेर ठाम निर्णय; तुळजापूरच्या यात्रा मैदानाचा मार्गी लावण्याचा शब्द

0 7 6 4 8 6

तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाले आमदार तानाजी सावंत;यात्रा मैदानाचा मार्ग लवकरच मोकळा – मंदिरातच दिला शब्द

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, जिल्हा पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधत आमदार सावंत यांनी तुळजापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली.

दर्शनासाठी मंदिराकडे जात असताना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी तुळजापूर शहरातील यात्रा मैदानाच्या मार्गाबाबत मुद्दा उपस्थित केला असता, आमदार तानाजी सावंत यांनी थेट आणि ठाम शब्दांत यात्रा मैदानाचा मार्ग लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले. देवीच्या चरणी दिलेला शब्द म्हणजे विकासाची हमी असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.याबाबत माहिती देताना शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी सांगितले की, तुळजापूरच्या विकासाशी संबंधित प्रश्न आमदार सावंत गांभीर्याने घेत असून यात्रा मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत त्यांनी स्पष्ट शब्द दिले आहेत. या आश्वासनामुळे शिवसैनिकांमध्ये तसेच भाविक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, तुळजापूरच्या विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे