Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

औसेकर महाराजांच्या दिंडीचे तुळजापुरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

औसेकर महाराजांच्या दिंडीचे तुळजापुरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

0 6 7 8 4 1

औसेकर महाराजांच्या दिंडीचे तुळजापुरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

तुळजापूर | प्रतिनिधी

माघी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या मल्लीनाथ महाराज संस्थान, औसा येथील माघवारी पायी दिंडीचे आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आगमन झाले. तुळजापूर (खुर्द) येथील नगर परिषद शाळा क्र. ३ येथे नगर परिषद तुळजापूरच्या वतीने दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी यांनी ह.भ.प. ज्ञानराज औसेकर महाराज यांचा शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान केला. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या स्वागत सोहळ्यामुळे परिसरात वारकरी संप्रदायाची अध्यात्मिक अनुभूती लाभली.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मोटे , नाथ सेवा मंडळाचे गणेश नन्नवरे, अजिंक्य नन्नवरे, नगर परिषद कार्यालयीन कर्मचारी प्रमोद माळी, हनमंत साबळे, शंकर भोजने, सुहास एकदंते, अक्षय ठेले, हर्ष साबळे, शेंडगे सर, राऊत सर तसेच अनेक वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे