Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूरच्या श्रुतीचा ‘फायटर’ चित्रपटात धमाकेदार प्रवेश!बालकलाकार श्रुती राजेश चोपदारची महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड..

बालकलाकार श्रुती राजेश चोपदारची महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड..

0 7 6 4 8 7

तुळजापूरच्या श्रुतीचा ‘फायटर’ चित्रपटात धमाकेदार प्रवेश!

बालकलाकार श्रुती राजेश चोपदारची महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड..

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

आगामी मराठी चित्रपट “फायटर” मध्ये तिर्थक्षेत्र तुळजापूरचा अभिमान वाढवणारी बालकलाकार श्रुती राजेश चोपदार हिची महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड झाली असून, सिनेसृष्टीतला तिचा हा पहिला मोठा टप्पा मानला जात आहे.

सिनेमॅटिक स्टुडिओ,निर्मितीखाली दिग्दर्शक मनोज अंकुशराव शिंदे आणि निर्माते अमरदीप महादेव पवार धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली तयार होणाऱ्या “फायटर” चित्रपटासाठी अलीकडेच ऑडिशन पार पडले. मराठवाड्यातील होतकरू कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी ठरली.

या ऑडिशनमध्ये आपल्या नैसर्गिक अभिनयाने चमक दाखवत श्रुती चोपदारने परीक्षकांची मनं जिंकली. तिच्या संवादफेकीतील आत्मविश्वास, भावनांची अचूक अभिव्यक्ती आणि कॅमेरासमोरील सहज वावर पाहून तिला चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात आली आहे.

श्रुतीच्या निवडीमुळे तुळजापूरमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कुटुंबीयांनी व शिक्षकांनी तिच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

“अभिनयाची आवड,सततची मेहनत आणि कलाक्षेत्रावरील प्रेम यामुळे श्रुती आज या टप्प्यावर पोहोचली आहे,”असे तिच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.

बालकलाकार म्हणून श्रुतीने मिळवलेली ही संधी भविष्यातील मोठ्या प्रवासाची सुरुवात मानली जात आहे.तिच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे