Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

हायवेवरील लुटारूंना एलसीबीने ठोकल्या बेड्या ८.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

0 7 6 5 0 5

हायवेवरील लुटारूंना एलसीबीने ठोकल्या बेड्या ८.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य करून कंटेनरमधील माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख २८ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे नवीन टायरने भरलेला कंटेनर सोलापूरहून धुळ्याकडे घेऊन जात असताना लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा परिसरात कंटेनरमधील टायर लुटण्यात आले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली पथक सक्रिय झाले. दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे संशयित अनिल मच्छींद्र पवार (वय ३४, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व नाना तानाजी शिंदे (वय २७, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) यांना शिताफीने अटक करण्यात आली.सखोल चौकशीत आरोपींनी हायवेवरील कंटेनरमधून टायर चोरी, पानगाव येथील चोरी तसेच वाशी, बेंबळी, येरमाळा व भादा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने आरोपींच्या सांगण्यावरून जंगल परिसरातून २९ नवीन टायर, ४ चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केला.ही उल्लेखनीय कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक हवालदार महबूब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वी केली.हायवेवरील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई महत्त्वाची ठरली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे