Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

हुंडा छळाचा बळी ठरली १९ वर्षांची विवाहित तरुणी! तुळजापूरात सासरच्या छळामुळे आत्महत्या, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

0 7 6 5 0 5

हुंडा छळाचा बळी ठरली १९ वर्षांची विवाहित तरुणी! तुळजापूरात सासरच्या छळामुळे आत्महत्या, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाख

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) पाटी येथे हुंडा व कौटुंबिक छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवघ्या १९ वर्षांच्या मुस्कान उर्फ पायल सुशील भालेराव या विवाहित तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुस्कान भालेराव हिने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सुशील भालेराव, सासरे हनुमंत भालेराव, सासू जयश्री भालेराव, दिर स्वप्नील भालेराव, पंचशीला स्वप्नील भालेराव व मयुरी हनुमंत भालेराव हे सर्व मुस्कानला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण तसेच शारीरिक व मानसिक छळ करत होते. सततच्या त्रासामुळे मुस्कान मानसिकरित्या खचली होती.या प्रकरणी फिर्यादी रहमान मोहम्मद शेख (वय ३१, रा. धारुर चौक, केज, जि. बीड) यांनी दि. २४ जानेवारी रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून आ.मृ. नं. ०५/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०८ व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, इतक्या लहान वयात विवाहितेचा जीव गेला यामुळे संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे