ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
प्रचाराला ‘जनआंदोलन’ स्वरूप; प्रभाग ५ मध्ये गंगणे समर्थकांचा जनसागर!
प्रचाराला ‘जनआंदोलन’ स्वरूप; प्रभाग ५ मध्ये गंगणे समर्थकांचा जनसागर!
0
7
6
4
9
7
प्रचाराला ‘जनआंदोलन’ स्वरूप; प्रभाग ५ मध्ये गंगणे समर्थकांचा जनसागर!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्या प्रचारयंत्रणेने आता आक्रमक मोडमध्ये प्रवेश केला असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये भावी नगरसेवक चंद्रशेखर उर्फे माऊली भोसले आणि नगरसेवक किशोर साठे यांच्या प्रचाराला महिलांनी अक्षरशः जनआंदोलनाचे स्वरूप दिले. या प्रचारयात्रेस माजी नगराध्यक्ष अर्चनाताईताई गंगणे, माजी नगराध्यक्ष भारतीताई गवळी यांची प्रभावी उपस्थिती लाभल्याने मोहीमेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग ५ मधील गल्लीबोळ, चौक, घराघरांतून उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणांचा गजर सुरू होता. महिला मतदारांचा प्रचंड उत्साह, त्यांचा स्वयंप्रेरणेने झालेला सहभाग आणि नेतृत्वाबद्दलचा दृढ विश्वास यामुळे हा प्रचार सोपा नसून निर्णायक टप्प्याचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सौ.अर्चनाताई गंगणे यांनी मतदारांशी संवाद साधताना प्रभागातील सातत्यपूर्ण विकासकामांचा आढावा घेतला. गटारी, रस्ते, पाणीपुरवठा, लाईट व्यवस्था, अंगणवाडी सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विकसित केलेली पायाभूत साधने – ही सर्व कामे “उगाच कागदावर नाहीत, तर प्रत्यक्ष मैदानावर दिसणारी वास्तवता आहे,” असा थेट संदेश त्यांनी मतदारांना दिला. तर भारतीताई गवळी यांनी महिलांच्या हक्कांसाठी उभारलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, “स्त्रीशक्तीचा निर्णयच यंदाची निवडणूक ठरवणार,” असे सांगत महिलांचे मनोबल उंचावले.
विनोद पिटू भैय्या गंगणे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गेल्या कार्यकाळात प्रभागात घेतलेल्या उपक्रमांची ‘काम बोलतंय’ ही छाप महिलांमध्ये विशेष भावत असल्याचे दिसले. चंद्रशेखर उर्फे माऊली भोसले यांच्या प्रभागनिहाय समस्यांवरील तत्पर प्रतिसादाची चर्चा अनेक ठिकाणी ऐकू आली. तर किशोर साठे यांच्या शांत, संयमी आणि विकासाभिमुख कामकाजाचा उल्लेख महिलांनी स्वतःहून केला.
या प्रचारसभेत उपस्थित महिलांची संख्या इतकी मोठी होती की काही वेळा रस्त्यावर हालचालही मंदावली. कुटुंबीयांसह, मैत्रिणींना घेऊन आणि कामाची वेळ बदलूनही अनेक महिला, तरुणी आणि जेष्ठ माता या प्रचारात सहभागी झाल्या. प्रभाग ५ मध्ये महिलांचा निर्णायक प्रभाव पाहता, या लोंढ्यानंतर गंगणे-भोसले-साठे यांचा विजयाची शक्यता अधिक मजबूत झाल्याची कुजबुज राजकीय कट्ट्यांवर सुरू आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये अशा दमदार शक्तिप्रदर्शनामुळे महायुतीचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असून विरोधकांच्या गणितात मोठी खळबळ उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
0
7
6
4
9
7



