Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर मार्गावर वाहतूक पोलिसांवर ‘लुटी’चा आरोप; भाविक-वाहनधारक संतप्त

तुळजापूर मार्गावर वाहतूक पोलिसांवर ‘लुटी’चा आरोप; भाविक-वाहनधारक संतप्त

0 7 6 4 8 6

तुळजापूर मार्गावर वाहतूक पोलिसांवर ‘लुटी’चा आरोप; भाविक-वाहनधारक संतप्त

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांच्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर अडवून वाहतूक पोलिसांकडून तपासणीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. या प्रकारामुळे भाविक, शेतकरी व सर्वसामान्य वाहनधारकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तुळजापूर–सोलापूर मार्गावर, विशेषतः तामलवाडी येथील टोलनाक्याजवळ वाहनांची अडवणूक करून कागदपत्र तपासणी व ऑनलाईन दंड वसुली केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या मध्यभागीच वाहने थांबवली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत असल्याची तक्रार आहे.मार्च अखेर जवळ आल्याने ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी कारवाई तीव्र केल्याची चर्चा असून, किरकोळ कारणांवरूनही दंड आकारला जात असल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितले. काही ठिकाणी रोख रक्कम देण्याचा दबाव टाकला जात असल्याचाही आरोप पुढे आला आहे.
कर्नाटकसह इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांना या प्रकाराचा सर्वाधिक फटका बसत असून, वाहने दीर्घकाळ अडवून ठेवल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने मागील वाहनांना अपघाताचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.नळदुर्ग–जळकोट दरम्यानही अशाच प्रकारे वाहनधारकांकडून आर्थिक वसुली होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकारामागे एका लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप असल्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून भाविक व वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे