Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

अवैध गांजा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! आरोपी ताब्यात

अवैध गांजा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! आरोपी ताब्यात

0 7 6 4 9 7

अवैध गांजा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! आरोपी ताब्यात

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबवित दि. ५ ऑक्टोबर रोजी हि मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांडवा येथे सापळा रचून २ लाख ८४ हजार ७२० रुपयांचा १४.२३६ किलो गांजा जप्त करत एक इसमाला ताब्यात घेतले आहे.

गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच सपोनि सुदर्शन कासार यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशी पोलीसांच्या मदतीने शनिवारी दि. ४ ऑक्टोबर रोजी मांडवा परिसरात छापा टाकला. या कारवाईत संजय अर्जुन शिंदे (वय ३५, रा. मांडवा, ता. वाशी, जि. धाराशिव) हा इसम गांजासह रंगेहाथ पकडला गेला.

घटनास्थळावरून हिरव्या रंगाचा, तीव्र वास असलेला गांजा एकूण १४.२३६ किलो इतका मिळून आला, ज्याची बाजार किंमत सुमारे २ लाख ८४ हजार ७२० रुपये इतकी आहे. पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३२३/२५ कलम ८(क), २०(२)(ब) अन्वये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने गांजा कुठून आणला व कोणाला विक्री करत होता याचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, दत्तात्रय राठोड, फरहान पठाण, दयानंद गादेकर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक सुभाष चौरे, रत्नदीप डोंगरे, बाबा जाधवर (पोस्टे वाशी), विठ्ठल मलंगनेर (पोस्टे वाशी) व नागनाथ गुरव यांनी सहभाग घेतला.या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

5/5 - (2 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे