तुळजापूर : पुजारी मंडळाच्या सर्व मागण्या मान्य — तुळजाभवानी मंदिर जतन-संवर्धनाला वेग
तुळजापूर : पुजारी मंडळाच्या सर्व मागण्या मान्य — तुळजाभवानी मंदिर जतन-संवर्धनाला वेग
तुळजापूर : पुजारी मंडळाच्या सर्व मागण्या मान्य — तुळजाभवानी मंदिर जतन-संवर्धनाला वेग
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने १७ ऑक्टोबर रोजी मंदिर संस्थानकडे दिलेल्या मागण्यांच्या पत्राची दखल घेत अखेर पुरातत्व विभागाने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. शुक्रवारी ( १४ नोव्हेंबर) मुंबई येथील सांस्कृतिक कार्य विभागात दुपारी चार तास झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध जतन-संवर्धन, धार्मिक विधी आणि मंदिर परिसरातील सुविधा यावर निर्णायक चर्चा झाली. बैठकीला डॉ. तेजस गर्गे (संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये) अध्यक्षस्थानी होते.

▪️बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
• श्री तुळजाभवानी मंदिराच्या जतन-संवर्धनासंबंधी झालेला पत्रव्यवहार पुजारी मंडळाला अधिकृतरित्या देण्यात येणार.
• मंदिराचा गाभारा जसाच्या तसा, मूळ स्वरुपात कायम ठेवण्यावर एकमत.
• मंदिराच्या तळभागाचा GPR सर्वेक्षण करण्यास मंजुरी.
• विद्युतगृह स्थलांतरित करणे आवश्यक.
• स्टेडियम काढून टाकून जुन्या ओवऱ्यांच्या रांगेत शक्य तितक्या नवीन ओवऱ्या उभारण्यात येणार.
• अभिषेक हॉल पाडून त्या जागी प्रस्तावित आराध्य रुमची निर्मिती.
• तारागृह पाडून मंदिराच्या प्राचीन वास्तुसंगतीत नवे तारागृह उभारण्याचा निर्णय.
• मंदिर परिसरात जनसुविधा केंद्र उभारण्यास परवानगी.
• तटबंदीचे मूळ स्वरूप जतन करण्यास मान्यता; तसेच जिजाऊ महाद्वार ते स्टेडियम मागील सीमा भिंतही पूर्ववत उभारण्यात येणार.
• लिफ्ट व रॅम्पसाठी जागा अपुरी असल्याने सध्या दगडी पायऱ्या बांधण्याचा निर्णय; अभिषेक हॉल पाडल्यानंतर उपलब्ध जागेत लिफ्ट-रॅम्पची व्यवस्था.
• धार्मिक विधी नेहमीच्या जागीच पार पडतील; कोणताही बदल नाही.
• सेंट्रल इमारत पाडून अंदाजपत्रकानुसार कमान उभारणे; दुसऱ्या बाजूला ‘शहाजीराजे दरवाजा’ची प्रतिकृती उभारण्यात येणार.
• भवानीशंकर मंडपातील प्रस्तावित 39 स्तंभांपैकी 4 स्तंभ पूर्ण; उर्वरीत स्तंभ 90 दिवसांत तयार करणे बंधनकारक.
• बैठकीचे इतिवृत मिळताच “अभिषेक हॉल” आणि “स्टेडियम” पाडण्यास पुजारी मंडळाने दिली सहमती.

बैठकीस उपस्थित
उपसंचालक हेमंत दळवी, सहाय्यक संचालक जया वाहणे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, मंदिर संस्थानाचे सहाय्यक व्यवस्थापक आर. एन. भोसले, जतन सहाय्यक आर. डी. निपाणे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच कंत्राटदार मुकेश जाधव व राम सवानी यांची उपस्थिती होती.




