Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

तामलवाडी पोलिसांचा गावागावात चोरीविरोधी मोहीमेचा प्रारंभ

तामलवाडी पोलिसांचा गावागावात चोरीविरोधी मोहीमेचा प्रारंभ

0 6 7 8 4 1

तामलवाडी पोलिसांचा गावागावात चोरीविरोधी मोहीमेचा प्रारंभ

तुळजापूर : प्रतिनिधी

तामलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या २७ गावांत तसेच राष्ट्रीय महामार्ग परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गावागावात चोरीविरोधी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी दिली.

दि. ८ नोव्हेंबर रोजी सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे सकाळी ९.३० ते १०.४० या वेळेत पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी सायबर गुन्हे, सायबर अवेअरनेस, वाहतूक नियमन, महिला व मुलींची सुरक्षा अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत, पोलिस उपनिरीक्षक जाकिर पटेल, कर्मचारी तेलप, पवार, पिंक पथकातील मपोना रोहिणी धुमाळ, पोहेका सोनाली जाधव, बीट अंमलदार संजय राठोड, वैशाली कोरे, आकाश सुरनर यांची उपस्थिती होती.सरस्वती विद्यालयातील ९२५ विद्यार्थी, मुख्याध्यापक वडणे, शिक्षक व कर्मचारीवर्ग, माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाद्वारे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे