Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध गावठी कट्टा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैध गावठी कट्टा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

0 7 6 4 8 6

तुळजापूर, : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिवने तुळजापूर येथे धडक कारवाई करत गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. या प्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके व पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विनोद उर्फ लाल्या बंडु हुच्चे-गवळी (वय २१, रा. आर्या चौक, तुळजापूर) याच्याकडे गावठी कट्टा असून तो बुलेट मोटारसायकलसह हडको मैदान येथे थांबलेला आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.५० वाजता पथकाने हडको मैदान परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोचलेला एक गावठी कट्टा व चेंबरमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे २५ हजार ५०० रुपयांचा गावठी कट्टा तसेच रॉयल एनफिल्ड कंपनीची एमएच २५ बीडी ०४०७ क्रमांकाची बुलेट मोटारसायकल असा एकूण २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोस्टे तुळजापूर येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून जप्त शस्त्र पुढील कारवाईसाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके यांच्यासह पोह अमोल निंबाळकर, जाधवर, चव्हाण, शिंदे, राठोड, पोना जाधवर, चापोह अरब, चापोकॉ दहीहंडे आदींच्या पथकाने केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे