Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

धाराशिव जिल्ह्याला लाभले कर्तबगार नेतृत्व; नागरिकांची कामे तात्काळ मार्गी ! जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या तत्परतेने सर्वसामान्यांना दिलासा

0 7 6 4 8 6

धाराशिव जिल्ह्याला लाभले कर्तबगार नेतृत्व; नागरिकांची कामे तात्काळ मार्गी !

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या तत्परतेने सर्वसामान्यांना दिलासा

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची नुकतीच भेट घेण्यात आली. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या व कामांकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देत त्या तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या संवेदनशील आणि कार्यक्षम प्रशासनामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धाराशिव जिल्ह्याला आज एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला अधिकारी लाभला असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी पुजार यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील विकासकामांना स्पष्ट दिशा मिळाली असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये ठरत आहेत.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टीने घेतलेले निर्णय आज जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. त्या विकास प्रक्रियेला विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक गती दिल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, प्रशासनिक सुधारणा आणि नागरिककेंद्री उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. यावेळी ॲड,योगेश केदार यांनीही जिल्हाधिकारी पुजार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत,सामान्य माणसाच्या प्रश्नाला प्राधान्य देणारे प्रशासन आज धाराशिवमध्ये अनुभवायला मिळत आहे,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.एकंदरीत, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून धाराशिव जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असून, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे नेतृत्व जिल्ह्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे