१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भूम : औदुंबर जाधव
एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वीची असून पीडिता घरी असताना आरोपी तरुणाने तिला खर्चासाठी पैसे देतो असे सांगत घराबाहेर नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर हा प्रकार कोणास सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडित मुलीने धैर्य दाखवत अखेर दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५१(२), ३५१(३), तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) कलम ४, ८, १२ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२)(व्हीए), ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आंबी पोलिस करत असून, गावात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.



