Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरात मनसेची दमदार एन्ट्री; नव्या संपर्क कार्यालयातून जनतेच्या प्रश्नांवर थेट लढाईची घोषणा!

हे केवळ कार्यालय नाही, तर सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ – धर्मराज सावंत

0 7 6 4 8 6

तुळजापूरात मनसेची दमदार एन्ट्री; नव्या संपर्क कार्यालयातून जनतेच्या प्रश्नांवर थेट लढाईची घोषणा!

हे केवळ कार्यालय नाही, तर सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ – धर्मराज सावंत

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात नवी चर्चा रंगवणारी घडामोड घडली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या संपर्क कार्यालयाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी, नागरी समस्या आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी आता मनसेचे स्वतंत्र हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे सज्ज असल्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आता थेट आवाज उठवला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.उद्घाटनप्रसंगी बोलताना मनसेचे माजी शहराध्यक्ष धर्मराज सावंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की हे केवळ राजकीय कार्यालय नसून जनतेचे हक्काचे केंद्र आहे. तुळजापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी हे कार्यालय २४ तास तत्पर राहील. प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवून न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे.कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वीज कामगार संघटनेचे कांबळे, मनसेचे माजी शहराध्यक्ष धर्मराज सावंत, तालुकाध्यक्ष धनाजी साठे यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी समीर शेख, विकास कदम, भैरू भोसले, दिलीप कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाही कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा अनावश्यक दिखावा न करता साधेपणाने कार्यालयाचे उद्घाटन करून मनसेने वेगळी ओळख निर्माण केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.संघटन बांधणीला नवी ताकद तुळजापूर शहरात मनसेच्या संघटन विस्तारासाठी हे कार्यालय महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, आगामी काळात नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत या उद्घाटनातून मिळाले आहेत. त्यामुळे शहराच्या राजकारणात मनसेची भूमिका अधिक प्रभावी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जनतेसाठी खुले दालन नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट कार्यालयात मांडाव्यात, त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नसल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आता नवी राजकीय चळवळ उभी राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे