ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापूर : राजकीय शक्तिप्रदर्शनाची धग; पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या २० नोव्हेंबरला भव्य रॅली
तुळजापूर : राजकीय शक्तिप्रदर्शनाची धग; पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखाली २० नोव्हेंबरला भव्य रॅली
0
7
6
4
8
6
तुळजापूर : राजकीय शक्तिप्रदर्शनाची धग; पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखाली २० नोव्हेंबरला भव्य रॅली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूरमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असून, शहरात एका भव्य आणि ऐतिहासिक शक्तिप्रदर्शनाची तयारी शिगेला पोहोचली आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या दृढ मार्गदर्शनाखाली, तर शहरातील प्रभावी नेतृत्व विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या रणनीतीतून ही रॅली आकाराला येत आहे.

पुढील नगराध्यक्ष म्हणून मजबूत दावेदार मानले जात असलेल्या विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्यासह विजय सर गंगणे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणाऱ्या या विराट रॅलीला शहरातील सर्व पदाधिकारी, आजी–माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे. रॅलीच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठका, विभागनिहाय आखणी आणि उत्साही वातावरणामुळे तुळजापूरच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
२० नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी ही रॅली तुळजापूरच्या राजकारणातील ‘शक्तिप्रदर्शनाचा नवा अध्याय’ ठरणार, अशी चर्चा शहरभर रंगली आहे. रॅलीच्या निमित्ताने मुख्य रस्त्यांवर सजावट, कमळ भगवे झेंडे, घोषणांच्या तालावर तयारीची धडपड यामुळे शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिटू गंगणे यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक बांधणी, शहरातील विविध भागांशी असलेला दुवा आणि कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे यामुळे ही रॅली भव्यतेच्या उच्चांकावर जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणूक रणसंग्रामाच्या उंबरठ्यावर असलेल्या तुळजापूरमध्ये या महाशक्तिप्रदर्शनामुळे नव्या समीकरणांचा उदय होणार की विद्यमान राजकीय आकृतिबंधाला अधिक बळ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रॅलीच्या माध्यमातून शहरातील जनतेसमोर आपली विकासनिष्ठ भूमिका स्पष्ट करण्यासोबतच संघटनेची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न गंगणे गटाने सुरू केला आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरची ही भव्यदिव्य रॅली तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या राजकीय दिशेला नवा कल देणारी ठरणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
0
7
6
4
8
6



