तुळजापूरात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू;नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन
तुळजापूरात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू;नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन
तुळजापूरात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू;नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !

तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरात नवीन बसस्टँड परिसरात आजारी अवस्थेत आढळलेल्या अनोळखी बेवारस पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी तुळजापूर पोलिसांनी आवाहन केले आहे.

पो.हे.कॉ.बि.डी.कामतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथून रेफर करण्यात आलेल्या या अनोळखी व्यक्तीचा धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.४० वाजता मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी एम. डी.पाटील यांनी एम.एल.सी.द्वारे याबाबत कळविले.सदर व्यक्तीचा पोस्टमार्टम करण्यात आला असून अद्याप त्याचे नातेवाईक शोधून मिळालेले नाहीत.धाराशिव पोलिस ठाणेकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अ.मृ. क्रमांक ९२/२०२५ नोंद आहे.

अनोळखी मृत पुरुषाचे वर्णन पुढीलप्रमाणे
▪️ वय अंदाजे ४० वर्षे
▪️वर्ण सावळा
▪️चेहरा अंडाकृती
▪️केस काळे, वाढलेले
▪️ दाढी आखूड
▪️अंगावर पांढरा रेघांचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट व काळी अंडरवेअर आहे.
सदर व्यक्ती नवीन बसस्टँड परिसरात आजारी अवस्थेत पडलेला मिळून आला होता.तरी संबंधित वर्णनाचा पुरुष आपल्या हद्दीत कोणाच्या नातेवाईकांचा हरवलेला असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित तुळजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तुळजापूर पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.



