Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहू नयेत -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

दिव्यांग हक्क अधिनियमानुसार सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

0 7 6 4 8 6

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहू नयेत -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

दिव्यांग हक्क अधिनियमानुसार सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

“दिव्यांग बांधव समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांचे प्रश्न तातडीने व प्राधान्याने मार्गी लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कोणताही दिव्यांग नागरिक योजना लाभांपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्या,”अशा शब्दांत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्रशासनाला जागृत केले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ३९ नुसार आयोजित संवेदनशीलता व जाणीवजागृती कार्यशाळेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. दिव्यांगांच्या पुनर्वसनापासून ते मूलभूत हक्कांपर्यंत प्रत्येक बाबीवर त्यांनी स्पष्ट व ठाम भूमिका मांडली.

सर्वात विभागांचा समन्वयच दिव्यांगांच्या प्रश्नांची उपाययोजना -जिल्हाधिकारी पुजार

कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील, केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण समितीचे सदस्य सुरेश पाटील, अतिरिक्त सीईओ निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

“दिव्यांग हक्क अधिनियम हा केवळ दयाभावाचा विषय नसून हा कायद्याने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम केले पाहिजे,” असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

वैश्विक ओळखपत्र, सहाय्यक उपकरणे व विविध शिबिरांद्वारे होणार सहाय्य

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले,
“आरोग्यविषयक शिबिरांद्वारे दिव्यांग बांधवांना दिव्यांग वैश्विक ओळखपत्र वितरित केले जात आहे.“सहायक उपकरणांसाठी विशेष शिबिरे घेऊन लाभ त्वरित देण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

“योजनांचे अभिसरण करून अधिकाधिक दिव्यांगांना प्रत्यक्ष फायदा मिळेल यावर भर आहे.”

त्यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले की कोणतीही फाईल, अर्ज किंवा योजना दिव्यांग बांधवांसाठी प्रलंबित ठेवली जाणार नाही.

दिव्यांग पुनर्वसन केंद्र लवकरच – कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हाधिकार्‍यांनी केली.

“दिव्यांग बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”

याचबरोबर प्रत्येक सरकारी कार्यालयात दिव्यांग अनुकूल सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना ग्रामपंचायतीच्या ५ टक्के निधीचा दिव्यांगांवर काटेकोरपणे वापर करण्याचे आवाहन केले.

लोकहिताचा प्रशासनिक दृष्टिकोन – जनतेत जिल्हाधिकारी पुजार यांच्या भूमिकेचे कौतुक

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील व परिणामाभिमुख भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर ठोस दिशा मिळत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दिव्यांगांसाठी सुरू असलेले उपक्रम अधिक वेगाने व कार्यकुशलतेने पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे