ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
0
7
6
5
0
5
लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर : प्रतिनिधी
आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका २१ वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दि.१५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३.३० ते ४.०० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तिने आनंदनगर पोलिसांकडे दाखल केली. या प्रकरणी पीडितेने दि. १६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
0
7
6
5
0
5



