Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

मूलभूत सुविधांपासून पत्रकार वंचित निवडणूक विभागाचे धीसाळ नियोजन

0 7 6 4 8 6

मूलभूत सुविधांपासून पत्रकार वंचित निवडणूक विभागाचे धीसाळ नियोजन

धाराशिव : प्रतिनिधी

नगरपरिषद निवडणुकीच्या वृत्तांकनासाठी,मध्यम कक्षात दाखल झालेल्या पत्रकारांना, कोणत्याच मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत.निवडणूक विभागाचा धीसाळ कारभार या निमित्ताने समोर आला आहे.धाराशिव येथील बाई उद्धवराव पाटील औद्योगिक केंद्रामध्ये, मतमोजणी ठेवण्यात आली होती. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. पोलिसांकडे पत्रकारांची अद्यावत यादी नसल्याने,ओळखपत्र असतानाही अनेक पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांनी रोखून धरण्याचा प्रकार घडला.माध्यम कक्षामध्ये,पत्रकारांना मतमोजणी कक्षातून अद्यावत माहिती देखील तब्बल चार तास उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे,निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पत्रकारांना मोठा फटका सहन करावा लागला.माध्यम कक्षामध्ये पत्रकारा व्यतिरिक्त निवडणूक उमेदवारांची प्रतिनिधी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडल्याने, सावळा गोंधळ अनुभवास आला. निवडणूक मतमोजणी कक्षातील एकाही जबाबदार अधिकाऱ्याने यासंदर्भात दखल न घेतल्याने, पत्रकारांनी माध्यम कक्षातून परतीचा मार्ग स्वीकारला. उमेदवार प्रतिनिधींबरोबर खासदाराच्या सहाय्यकाचा भोजनावर ताव..माध्यम कक्षामध्ये पत्रकार निघून गेल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आणि आमदार खासदारांच्या प्रतिनिधींनी कब्जा केला.त्यांच्या सोबतीला बंदोबस्तातील पोलीस देखील आरामात बसल्याचे दिसून आले. धाराशिवच्या खासदाराचे स्वीय सहाय्यक,आपल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक आयोगाच्या भोजनावर यच्छाद ताव मारत असल्याचे दिसून आले. बंदोबस्त तील पोलिसांनीही यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला.
निवडणूक विभागाचा यावेळी अत्यंत बेजबाबदारपणा दिसून आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे