Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिस निष्क्रियतेविरोधात नगराध्यक्षांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

जुगार, मटका, देहविक्री खुलेआम सुरूच;"मूळ सूत्रधारांवर कारवाई करा"- नगराध्यक्ष विनोद गंगणे

0 6 7 8 4 1

तुळजापूरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिस निष्क्रियतेविरोधात नगराध्यक्षांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

जुगार, मटका, देहविक्री खुलेआम सुरूच;”मूळ सूत्रधारांवर कारवाई करा”- नगराध्यक्ष विनोद गंगणे

तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढल्याचा गंभीर आरोप करत नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांनी पोलिस प्रशासनावर थेट हल्लाबोल केला आहे. शहरात सुरू असलेल्या जुगार, मटका, तिरट, चक्री तसेच देहविक्रीसारख्या प्रकारांवर तात्काळ आळा घालावा, अन्यथा पुढील आठवड्यात पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.यासंदर्भात नगराध्यक्ष गंगणे यांनी तुळजापूर पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे.

तुळजापूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असल्याने येथे दररोज हजारो भाविक येतात. मात्र, शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, काही समाजकंटकांकडून खुलेआम मटका, जुगार, चक्री, गुटखा, अवैध दारू, गांजा तसेच वेश्या व्यवसाय सुरू असूनही पोलिसांकडून अपेक्षित ती ठोस कारवाई होत नाही. किरकोळ एजंट किंवा लहानसहान व्यक्तींवर कारवाई करून केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.“या अवैध धंद्यांच्या मूळ सूत्रधारांवरच कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशारा नगराध्यक्षांनी दिला आहे. या निवेदनावर नगरसेवक तथा गट नेते औदुंबर कदम, किशोर साठे, नरेश अमृतराव, माऊली भोसले, सागर कदम, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, दिनेश शिरसागर, पंडित जगदाळे, अजित परमेश्वर, आनंद सावंत, विजय कंदले, विशाल रोजकरी या सर्व नगरसेवक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान, या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली असून प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

गावठी पिस्तुलांचा वाढता धोका; फायरिंगच्या घटनांची चौकशीची मागणी तुळजापूर शहरात अवैध गावठी पिस्तुलांचा वापर वाढत असल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे. मागील दोन महिन्यांत दोन ठिकाणी फायरिंगच्या घटना घडल्या असून तीसरे प्रकरण आठवडा बाजार परिसरात एका आरोपीला गावठी बंदुकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे