ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर खुर्दच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात झेप; डॉ. प्रतीक्षा जगदाळे एमबीबीएस उत्तीर्ण
तुळजापूर खुर्दच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात झेप; डॉ. प्रतीक्षा जगदाळे एमबीबीएस उत्तीर्ण

0
7
6
4
9
6
तुळजापूर खुर्दच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात झेप; डॉ. प्रतीक्षा जगदाळे एमबीबीएस उत्तीर्ण
तुळजापूर : ग्रामीण मातीतून उभारी घेत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत तुळजापूर खुर्द येथील कु.प्रतीक्षा पंडितराव जगदाळे यांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होत यशाची नवी उंची गाठली आहे. त्यांच्या या यशामुळे तुळजापूर शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.
डॉ. प्रतीक्षा या तुळजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पंडितराव जगदाळे यांच्या कन्या आहेत. सामाजिक कार्याची परंपरा लाभलेल्या या कुटुंबातील नव्या पिढीने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात पाऊल टाकत समाजसेवेचा वारसा पुढे नेला आहे.वैद्यकीय क्षेत्रात कार्य करताना ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे तुळजापूर खुर्दच्या जगदाळे परिवाराची कीर्ती आणखी उंचावली असून अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळत आहे.दरम्यान, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0
7
6
4
9
6



