Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंढरपुरात २० लाख वारकऱ्यांचे फेस रेकग्निशन; सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या तंत्रज्ञानाचा विधानसभेत गौरव

पंढरपुरात २० लाख वारकऱ्यांचे फेस रेकग्निशन; सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या तंत्रज्ञानाचा विधानसभेत गौरव

0 7 6 4 8 6

पंढरपुरात २० लाख वारकऱ्यांचे फेस रेकग्निशन; सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या तंत्रज्ञानाचा विधानसभेत गौरव

सोलापूर : ज्ञानेश्वर गवळी

आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे तब्बल २० लाखांहून अधिक वारकऱ्यांचे फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे नोंद व पडताळणी करून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीसांनी सुरक्षा व्यवस्थेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या आधुनिक उपक्रमाचे विधानसभेतही विशेष कौतुक करण्यात आले.शिवसेना सचिव, प्रवक्त्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी सभागृहात बोलताना या उपक्रमाचा विशेष उल्लेख करत सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या कार्यतत्परतेचे आणि तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगचे भरभरून कौतुक केले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीतही सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अत्यंत सक्षम पोलीस बंदोबस्त उभारण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.फेस रेकग्निशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे संशयितांची ओळख पटविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे तसेच गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालणे शक्य झाले असल्याचेही कायंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, वारकरी संप्रदायाच्या भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सोलापूर ग्रामीण पोलीसांनी दाखवलेली सजगता, नियोजन आणि तांत्रिक तयारी ही राज्यातील पोलीस यंत्रणेसाठी आदर्श ठरणारी असल्याची भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे