शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेशोत्सव; धाराशिव जिल्ह्यात संघटन बळकट
शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेशोत्सव; धाराशिव जिल्ह्यात संघटन बळकट

शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेशोत्सव; धाराशिव जिल्ह्यात संघटन बळकट
धाराशिव, : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विविध पक्षांतील सक्रिय कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू असून, गेल्या दोन दिवसांत झालेल्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. सत्तेबाहेर असूनही संघर्षासाठी सज्ज असलेली मोठी फळी उभी राहत असल्याचे सकारात्मक चित्र धाराशिव जिल्ह्यात दिसून येत आहे.अनसुर्डा (ता. धाराशिव) येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे व सहसंपर्कप्रमुख नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.यामध्ये बालाजी माने, महेश पाटील, शरद गायकवाड, अमोल तावरे, बिभीषण माने, राजाभाऊ गायकवाड, लक्ष्मण पवार, नंदकुमार माने, तानाजी माने, मुशीर शेख, कृष्ण वानकर, तानाजी पवार, सिद्धांत भोसले, प्रदीप सुतार, पांडुरंग माने, पांडुरंग बोंदर, आदिल बोंदर, ज्ञानेश्वर माने, आरिफ शेख, सूरज पवार, दीपक माने, प्रशांत खापरे, विजय गायकवाड, रामा डोके, शंकर वाकर, पंडित मोकाशी, व्यंकटेश माने, अजित कुठे, बालाजी सुतार, अनिकेत माने, रामनाथ माने, उमेश पवार, सागर अडसुळे, दादासाहेब माने, अक्षय काळे, राहुल साळुंखे, मयूर जमदाडे आदींचा समावेश होता.दरम्यान, भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य व चिलवडीचे माजी उपसरपंच अजित सावंत तसेच संतोष राजगुरू यांनीही शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने चिलवडी परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली आहे.

▪️मोहतरवाडी व विठ्ठलवाडीतील युवकांचा लोंढा
मोहतरवाडी व विठ्ठलवाडी येथील मोठ्या संख्येतील युवकांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. यामध्ये राजाभाऊ चव्हाण, उद्धव चव्हाण, अच्युत कांबळे, पद्माकर खोन, धनाजी गडकर, पोपट शेलार, वैभव मळगे, हनुमान शेळके, शरद चव्हाण, विनोद मळगे, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानेश्वर आंधळे, कार्तिक पांचाळ, सुरज चव्हाण, वैभव चव्हाण, सागर कांबळे, बाळू मळगे, विजय शेळके, प्रदीप मळगे, महादेव पाडुळे, समाधान झुंबरे, ओमकार झुंबरे, गौतम पाटोळे, दादासाहेब चव्हाण, सुमित मळगे, बापू मळगे, रोहन चव्हाण, अनिकेत मळगे, दत्ता मस्के, साहेबराव चव्हाण, अमित आंधळे, अक्षय मळगे, ज्ञानेश्वर चव्हाण, अजय शेळके, उमेश गडकर, प्रकाश पाडुळे, लहू मस्के, आकाश चव्हाण, मोहन आंधळे, आप्पासाहेब चव्हाण, संतोष पाडुळे, महादेव गडकर, विठ्ठल पाटोळे, पांडुरंग आंधळे, चंदर भोसले, विकास चव्हाण यांचा समावेश होता.

▪️इतर महत्त्वाचे प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक सेलचे कळंब तालुका अध्यक्ष सतीश शिंपले यांनी शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच करजखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद सुरवसे व सदस्य दादासाहेब नागटिळे यांनीही पक्षप्रवेश घेतला.या प्रवेशांमुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये या प्रवेशोत्सवाचा मोठा परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.




