विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या तर्फे दिवाळीची गोड भेट;५००० कुटुंबांना किराणा किट आज वाटप !
आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम!
विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्या तर्फे दिवाळीची गोड भेट;५००० कुटुंबांना किराणा किट आज वाटप !
आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेत्र तुळजापूरमध्ये समाजकारण आणि मानवतेचा सुगंध दरवळवणारा उपक्रम — “दिवाळी किराणा किट वाटप” यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. गेली तब्बल सोळा वर्षे सुरू असलेल्या या परंपरेत यंदाही शहरातील तब्बल ५,००० गोरगरीब व कष्टकरी कुटुंबांना दिवाळी सणाचा आनंद देण्यासाठी युवा नेते विनोद उर्फ पिटू भैय्या गंगणे यांनी पुढाकार घेतला आहे.

हा उपक्रम आगामी शनिवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सायं.६ वाजता हाडको मैदान,तुळजापूर येथे भव्य प्रमाणावर पार पडणार आहे. कार्यक्रमास आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,भाजप नेते सुनील चव्हाण,नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, सज्जन सांळुके, लखन पेंदे,शांताराम पेंदे , विशाल छत्रे, मनोज गवळीसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या दिवाळी भेट उपक्रमात दरवर्षीप्रमाणेच यंदाही समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंदाची किरणे पोहोचवण्याचे कार्य होत आहे.
विनोद गंगणे यांनी सांगितले की, “आपल्या शहरातील प्रत्येक घरात दिवाळीचा प्रकाश पोहोचावा,कोणीही अंधारात राहू नये, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे.”





