ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी रोहित चव्हाण यांची निवड !

0
6
7
8
4
1
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी रोहित चव्हाण यांची निवड !
तुळजापूर, : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी तुळजापूर येथील युवा व उत्साही कार्यकर्ते रोहित रत्नाकर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. भाजपमध्ये सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या चव्हाण यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतिक रोचकरी यांच्या हस्ते रोहित चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिनेश बागल, समर्थ पैलवान यांच्यासह युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीसाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी सभापती विजय गंगणे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना पक्षाचे धोरण व विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प असल्याचे रोहित चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून कौतुकाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0
6
7
8
4
1



