ब्रेकिंगमहाराष्ट्र
शेजाऱ्यांकडून महिलेला मारहाण व जिवेमारण्याची धमकी; नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंद न झाल्याने थेट एसपींकडे धाव
धक्कादायक प्रकार; न्याय न मिळाल्याने पीडितेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार

0
7
6
4
8
6
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील चिखली तांडा येथील सौ.बेबी विनायक राठोड यांनी शेजाऱ्यांकडून होत असलेल्या मारहाण,जिवे मारण्याची धमकी व मानसिक त्रासाबाबत दि.२० फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. गेल्या सात वर्षांपासून माहेरी वास्तव्यास असलेल्या सौ. बेबी राठोड यांना कोणतेही कारण नसताना शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींनी वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारीनुसार, संबंधित पाच जणांकडून लाकूड व कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असून, महिलेसह त्यांच्या वडिलांनाही धमकावले जात आहे. पती ड्रायव्हर म्हणून बाहेरगावी गेल्यानंतर या त्रासात वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पाच दिवस प्रयत्न करूनही गुन्हा नोंद न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखींचा गैरफायदा घेत तक्रार दडपली जात असल्याचा गंभीर आरोपही अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे कंटाळून अखेर पीडित महिलेने थेट पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


0
7
6
4
8
6



