Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

दर्शवेळा अमावास्येच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिसांचा सतर्क इशारा घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

0 7 6 4 8 6

दर्शवेळा अमावास्येच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिसांचा सतर्क इशारा घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दर्शवेळा अमावास्येच्या निमित्ताने ग्रामीण भागात वनभोजनाची परंपरा जोपासली जाते. या दिवशी अनेक नागरिक कुटुंबीयांसह शेताकडे जात असल्याने गावांतील घरे रिकामी राहतात. परिणामी घरफोडी व चोरीच्या घटनांची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन लोहारा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अमावास्येच्या दिवशी घरे रिकामी ठेवताना विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घरातील मौल्यवान दागिने, रोकड व किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात किंवा शक्य असल्यास किमान एक व्यक्ती घरी थांबेल याची व्यवस्था करावी.

अमावास्येच्या काळात चोरीचे प्रकार वाढत असल्याचा अनुभव लक्षात घेऊन लोहारा पोलिसांकडून गावोगावी गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस पेट्रोलिंग नियमित सुरू असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी केले आहे.

गावातील अनोळखी व्यक्ती, संशयास्पद वाहनांची ये-जा किंवा कुठलीही शंका वाटल्यास तात्काळ लोहारा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. वेळेत मिळालेली माहिती अनेक वेळा मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत लोहारा पोलिस सज्ज असून दर्शवेळा अमावास्येच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून दक्ष राहावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.दर्शवेळा अमावास्येचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता सतर्कता बाळगल्यासच सणाचा खरा आनंद घेता येईल, असे मतही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे