Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या पावणनगरीत “जय जगदंब” पुस्तकाचा भव्य सोहळा; ५ एप्रिलला प्रकाशन

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या पावणनगरीत "जय जगदंब" पुस्तकाचा भव्य सोहळा; ५ एप्रिलला प्रकाशन

0 7 6 4 8 6

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या पावणनगरीत “जय जगदंब” पुस्तकाचा भव्य सोहळा; ५ एप्रिलला प्रकाशन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत लेखक श्रीकृष्ण गंगाधरराव दीक्षित लिखित “जय जगदंब” या कॉफीटेबल पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता वंश पॅलेस, पुजारी नगर, नळदुर्ग रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील राहणार आहेत. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमास विधान परिषदेचे सदस्य सतीश चव्हाण, भोकरच्या आमदार अमिताताई चव्हाण, मुखेड-कंधारचे आमदार डॉ. तुषार राठोड,भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,नांदेडच्या महापौर कविता संतोष मुळे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून नायगावचे आमदार राजेश पवार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद गंगणे, देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक लक्ष्मीकांत आचार्य, शरयू आचार्य, समीर देशपांडे, रोहिणी देशपांडे, अमरनाथ राजूरकर व मृणाल राजूरकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे