Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाचा फटका भाविकांना अचानक दुकाने बंद; दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची गैरसोय

व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाचा फटका भाविकांना अचानक दुकाने बंद; दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची गैरसोय

0 7 6 4 8 6

व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाचा फटका भाविकांना अचानक दुकाने बंद; दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची गैरसोय

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या शहाजीराजे महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक ठिय्या आंदोलन छेडत दुकाने बंद ठेवल्याने तुळजापूरात दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. महाद्वार परिसरातील अनेक दुकाने बंद असल्याने भाविकांना पिण्याचे पाणी, प्रसाद, पूजासाहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
भाविक भक्तांसाठी महाद्वार प्रवेश पूर्ववत सुरू करावा, तीन फूट फुटपाथ वापरण्यास परवानगी द्यावी तसेच पाच फूट सायवान उभारण्यास मंजुरी द्यावी या मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, या आंदोलनाचा थेट परिणाम भाविकांवर झाल्याचे दिसून आले.अधिक मास आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असताना अचानक दुकाने बंद झाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. काही भाविकांनी आंदोलनाचा अधिकार मान्य असला तरी त्यासाठी भाविकांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.दरम्यान, व्यापारी संघटना आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे भाविकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी भाविक भक्तांसहनागरिकांकडून होत आहे.

▪️”भाविक वेठीस, प्रश्न अद्याप कायम”

तीर्थक्षेत्र तुळजापूरची अर्थव्यवस्था भाविकांवर अवलंबून असताना व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आंदोलन आणि भाविकांची सोय यामध्ये समतोल राखण्याची गरज व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे