ब्रेकिंगमहाराष्ट्र
सिलिंग जमिनींना वर्ग-१चा दर्जा; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाच्या प्रस्तावास मंजुरी; भोगवटादारांना दिलासा, निवेदनाला यश
सिलिंग जमिनींना वर्ग-१चा दर्जा; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाच्या प्रस्तावास मंजुरी; भोगवटादारांना दिलासा, निवेदनाला यश

0
7
6
4
8
6
सिलिंग जमिनींना वर्ग-१चा दर्जा; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाच्या प्रस्तावास मंजुरी; भोगवटादारांना दिलासा, निवेदनाला यश
तुळजापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सिलिंग अंतर्गत येणाऱ्या भोगवटादार वर्ग-२ जमिनींना वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो भोगवटादारांना मोठा दिलासा मिळणार आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे यासंदर्भात सातत्याने निवेदन व पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या मागणीला यश मिळाल्याने संबंधित शेतकरी व भोगवटादारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.सदर निर्णयामुळे ‘जमिनीची कमाल धारणा कायदा’ अंतर्गत वर्ग-२ मध्ये असलेल्या जमिनींना आता वर्ग-१चा दर्जा मिळणार असून, त्यावर असलेली अनेक कायदेशीर बंधने शिथिल होणार आहेत. परिणामी, जमीनधारकांना व्यवहार, कर्जप्राप्ती तसेच विकासाच्या दृष्टीने अधिक सुलभता मिळणार आहे.या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम तुळजापूर यांचे स्वागत करताना तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील ,तालुक्याचे नेते सुनील चव्हाण तसेच शिवसेनेचे नेते विकास जाधव – पाटील यांनी वर्ग दोनच्या जमीन धारकास निर्णय घेतल्याबद्दल स्वागत केले.
0
7
6
4
8
6