Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

भव्यदिव्य रॅलीत आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा जणू विजयी हुंकार! विरोधकांना चितपट करणारी पिटू गंगणे यांची अचूक राजकीय चाल यशस्वी !

तुळजापूरमध्ये बदलाचा वार… विजयाची चाहूल… आणि विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ!

0 7 6 4 9 7

भव्यदिव्य रॅलीत आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा जणू विजयी हुंकार!

विरोधकांना चितपट करणारी पिटू गंगणे यांची अचूक राजकीय चाल यशस्वी !

तुळजापूरमध्ये बदलाचा वार… विजयाची चाहूल… आणि विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या दमदार नेतृत्वाखाली तुळजापूरमध्ये काढण्यात आलेल्या भव्यदिव्य रॅलीने विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून दिली.
रॅलीच्या प्रचंड गर्दीने आणि घोषणांनी शहर अक्षरशः दणाणून गेले.

यावेळी मंचावरून बोलताना राणा पाटलांनी विरोधकांना थेट इशारा देत म्हटले -“खोटं नाटक बोललं तर सहन करणार नाही; बोलायचं असेल तर विकासावर बोला!”राणा पाटलांचा हल्लाबोल सुरूच – ठाकरे सरकारच्या काळात रेल्वेसाठी एक रुपया मिळाला नाही, विरोधकांनी एक पाकीट मारसुद्धा पकडून दाखवीला नाही.
महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री सर्व तुमचे होते…“तुळजापूर शहरासाठी त्या अडीच वर्षांत काय केलं ते आधी सांगा!”असा सवाल त्यांनी थेट मंचावरून केला.

महंतांच्या नावावरून खोटे नाते सांगू नका “नाहीतर महंतच सर्व सांगतील!”महंतांच्या संदर्भातील चर्चेवर बोलताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्पष्ट केले की काही जण मुद्दाम अफवा पसरवत आहेत.“खोटं नाटे सांगू नका… नाहीतर महंतच काय खरं ते सांगतील!”असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

“तुळजापूरला तिरुपतीसारखे बनवू; दहा वर्षांची हमी माझी आहे!” राणा पाटील भव्य रॅलीत जनसमुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आमदार राणा दादांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला.“शहराच्या गरजा पूर्ण करणार, मंदिर महाद्वाराशेजारी मोठा सभामंडप उभारतोय.जनता आपल्या पाठीशी आहे. स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पिटू गंगणे यांची रणनीती यशस्वी-विरोधकांचा आवाज बसला! नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्या रणनीतीने प्रभाग ते शहरभर विरोधकांना चितपट केले आहे.रॅलीतील उत्साह पाहून जनतेने आधीच निकाल देऊन टाकल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

 

जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले “आजची रॅली पाहून स्पष्ट झाले की निकाल आजच लागला… विजय पिटू गंगणे यांचाच!”एमबीबीएस डॉ. अनुजा अजित परमेश्वर- बिनविरोध विजयातून संदेश स्पष्ट!

तुळजापूर शहराने आमदार राणाजगजितसिंह पाटील व टीमवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत डॉ. अनुजा परमेश्वर यांना बिनविरोध निवडून दिले.
यातून शहरातील मतदारांचा मूड कोणत्या दिशेने आहे हे स्पष्ट झाले आहे.२ डिसेंबरला पुन्हा इतिहास घडणार – कमळाच्या चिन्हावर भरघोस मतदानाची हाक“तुळजापूर शहराने विधानसभेला ३ हजारांची लीड देऊन आमदार राणा दादांना निवडून आणले.तसाच विश्वास तुम्ही २ डिसेंबरलाही दाखवा,”
असे आवाहन करत राणा दादांनी गंगणे यांच्या टीमसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.“व्यापार दुपटीने-तिपटीने वाढेल; निर्णय पुजारी व व्यापाऱ्यांच्या विश्वासात घेऊनच!”पुढची पाच वर्षं असे काय झालं तर…“मी स्वतः कान धरून सांगीन!” आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शब्दातील आहे.

हे विधान ऐकताच मंदिर परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला.राणा पाटलांनी प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारत जनतेला पाच वर्षांत मोठ्या परिवर्तनाचे आश्वासन दिले.रॅलीत आजी-माजी नगराध्यक्ष व ३३ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
नगरपालिका निवडणूक रिंगणातील सर्व २३ उमेदवार, आजी-माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित राहिल्याने रॅलीचे शक्तिप्रदर्शन अधिकच भव्य ठरले.

1/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे