कासिफ सय्यद यांचे ईस्पोर्ट्स मध्ये उल्लेखनीय यश
आरळीच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुकास्पद कामगिरी
कासिफ सय्यद यांचे ईस्पोर्ट्स मध्ये उल्लेखनीय यश
आरळीच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुकास्पद कामगिरी
तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील कासिफ ख्वाजाभाई सय्यद यांनी नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या व्हॅलोरंट कॅम्पस क्वेस्ट एस थ्री या राष्ट्रीय पातळीवर झालेल्या महाविद्यालयीन
ईस्पोर्ट्स या खेळात ग्रॅण्ड फायनलमध्ये विजेता टीमचे प्रतिनिधित्व केले आहे.
दिल्ली येथील अंतिम सामन्यात कासिफ ख्वाजाभाई सय्यद आणि त्यांची टीम अंतिम विजेती ठरली. नुकतेच भारत सरकारने ई स्पोर्ट्सला ऑलम्पिक खेळ म्हणून मान्यता दिली आहे.
कासिफ सय्यद सध्या मुंबई येथे स्थित असून सिंबायोसिस पुणे येथून एमबीएचे शिक्षण घेत आहे. तो प्रोफेशनल ईस्पोर्ट प्लेअर असून आत्तापर्यंत त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून देश विदेशात विजय मिळवत भारताचे
प्रतिनिधित्व करतो आहे.
मुंबई येथील प्रसिद्ध आर्ट डिझायनर के.सय्यद म्हणजे आरळी बुद्रुक येथील ख्वाजाभाई सय्यद यांचा कासीफ मुलगा आहे. मागील 5 वर्षापासून ऑनलाईन गेम प्रकारात आपले योगदान देतो आहे, कासिफ सय्यद यांच्या नाविन्यपूर्ण गेमच्या योगदान व आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्धल आरळीसह तुळजापूर तालुक्यातील नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून कौतुक केले जात आहे.



