ब्रेकिंगमहाराष्ट्र
महागाईच्या भडका विरोधात काँग्रेस रस्त्यावर; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन
महागाईच्या भडका विरोधात काँग्रेस रस्त्यावर; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन

0
7
6
4
9
6
महागाईच्या भडका विरोधात काँग्रेस रस्त्यावर; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन
धाराशिव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना काँग्रेस पक्षाने शुक्रवार दि.२९ मे रोज देशपांडे स्टँड येथे जोरदार आंदोलन छेडत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदविला.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “इंधन दरवाढ रद्द करा”महागाई करणारे सरकार हाय हाय“सामान्य जनतेची लूट बंद करा” “शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो”अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करून इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा परिणाम शेती, वाहतूक, व्यापार आणि घरगुती खर्चावर होत असून जनतेला मोठा आर्थिक फटका बसत आहे.आंदोलनात खलील सय्यद, प्रशांत पाटील, मेहेबूब पटेल, स्मिता शहापूरकर, नगरसेवक अझर पठाण, ॲड. हेड्डा, अप्पासाहेब शेळके, धनंजय राऊत, राम आलुरे, राजू तोडकर, नाना भोसले, विलास साळू, मधुकर यादव, अर्जुन बिराजदार, विजय वाघमारे, शहाजी मुंडे, उस्मान कुरेशी, संग्राम मुंडे, अशोक बनसोडे, गोरोबा झेंडे, मिलिंद गोवर्धन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

▪️महागाईने सर्वसामान्यांचा श्वास कोंडला
इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
0
7
6
4
9
6



