Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

लाच प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता; शालेय पोषण आहार प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

लाच प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता; शालेय पोषण आहार प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

0 7 6 4 8 6

लाच प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता; शालेय पोषण आहार प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

धाराशिव : बेंबळी येथील शालेय पोषण आहार प्रकरणातील लाच मागणी व स्वीकारल्या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत समिती अध्यक्ष सौ. शोभा गायकवाड, त्यांचे पती सुधीर गायकवाड व तुकाराम उंबरे या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.प्रकरण क्रमांक स्पेशल केस नं. ९७/२०१८ (सरकार विरुद्ध शोभा गायकवाड व इतर, गुन्हा नोंद क्र. ९६/२०१८) अंतर्गत कलम ७, १२, १३(१)(ड), १३(२), ७, १२, १३(१)(ड), १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोप ठेवण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

सन २०१६-२०१७२०१८-२०१९ या कालावधीत बेंबळी जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी खिचडी व भोजन बनविण्याचे काम तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांना देण्यात आले होते. मात्र हे काम कायम ठेवण्यासाठी किंवा काढून टाकण्याच्या कारणावरून सौ. शोभा गायकवाड व त्यांचे पती सुधीर गायकवाड यांनी तक्रारदारांकडे २०,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो, धाराशिव येथे करण्यात आली होती.
यानंतर तडजोडीअंती १५,००० रुपये देण्याचे ठरले व सापळा रचण्यात आला. त्यात तुकाराम उंबरे यांच्या मार्फत १०,००० रुपये स्वीकारल्याचा आरोप ठेवून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात सरकार पक्षाकडून तक्रारदार, पंच साक्षीदार, तक्रारदाराची पत्नी, ऑडिओ रेकॉर्डिंग, पोलिस साक्षीदार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली.
उलटतपासात उघड झाले मुद्दे
आरोपींच्यावतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी साक्षीदारांचा कसून उलटतपास करत अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. त्यात तक्रारदाराच्या कामाबाबत समितीचे आक्षेप, बोगस करारनामा व खोट्या नोटरीची कागदपत्रे, संबंधित वर्षात कामच न मिळाल्याचा मुद्दा, तसेच उसनी रक्कम परत करण्याच्या वादातून खोटी तक्रार केल्याचा युक्तिवाद करण्यात आला.तसेच तक्रारदाराने द्वेषातून खोटी तक्रार दिली व एसीबीमार्फत कट रचल्याचा युक्तिवादही करण्यात आला. तसेच sanction of prosecution चुकीची असल्याचाही मुद्दा मांडण्यात आला.

न्यायालयाचा निर्णय

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व पुरावे विचारात घेऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. देव मॅडम यांनी सबळ पुराव्याअभावी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात ॲड. विशाल साखरे, ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, पृथ्वीराज खोचरे व महेश पवार यांनी सहकार्य केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे