ब्रेकिंगमहाराष्ट्र
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची कात्रज येथे पदाधिकारी बैठक; नव्या नियुक्त्या, उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची कात्रज येथे पदाधिकारी बैठक; नव्या नियुक्त्या, उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

0
7
6
5
0
5
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची कात्रज येथे पदाधिकारी बैठक; नव्या नियुक्त्या, उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान
पुणे : भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, ठाणे यांच्या वतीने पुणे येथील कात्रज परिसरात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. १४ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.या बैठकीत संस्थेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शिरूर तालुक्यातील दीपक गडकर यांची शिरूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक महिलांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष श्रीमती कल्पनाताई विठ्ठल मुंडे यांना पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या विविध स्तरांवरील अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईहून आलेल्या संपूर्ण टीमचे स्वागत जिल्हाध्यक्ष गणेश फलके व कल्पनाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

0
7
6
5
0
5