Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ॲड.माढेकरांच्या युक्तिवादाला यश;निवडणूक अधिकारीांकडून स्पष्ट आदेश

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पाडोळी गणातील वाद निकाली

0 6 7 8 4 1

ॲड.माढेकरांच्या युक्तिवादाला यश;निवडणूक अधिकारीांकडून स्पष्ट आदेश

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक पाडोळी गणातील वाद निकाली

धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत पंचायत समिती गण क्रमांक ४९ पाडोळी येथील उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद अखेर कायदेशीर प्रक्रियेतून निकाली निघाला आहे. सुरज दादाराव इंगळे (रा. कनगरा) यांच्या नामनिर्देशन अर्जाविरोधात दाखल करण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला आहे. त्यामुळे पाडोळी गणातील निवडणूक रणांगणात इंगळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मनोज खंडू वाघमारे (रा. मेंढा) यांनी इंगळे यांनी दोन नामनिर्देशन अर्जांवर एकाच सुचकाची सही घेतल्याचा आक्षेप घेत अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी दि. २२ व २३ जानेवारी रोजी सविस्तर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी सखोल कायदेशीर परीक्षणानंतर निर्णय जाहीर केला.छाननीदरम्यान इंगळे यांनी दाखल केलेल्या दोन अर्जांपैकी एक अर्ज अवैध ठरविण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र राष्ट्रीय पक्षातून दाखल करण्यात आलेला दुसरा अर्ज सर्व निकष पूर्ण करणारा असल्याने तो वैध ठरविण्यात आला. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम, १९६२ नुसार एक सुचक एका अर्जासाठीच पात्र असतो, व त्या नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही आधीच करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आक्षेप अर्जाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणात गैरअर्जदार आमच्या वतीने ॲड. एम .बी.माढेकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांना अ‍ॅड. अमर इंगळे, ॲड. धर्मराज सरडे व ॲड. विशाल बारकुल यांनी सहकार्य केले. या निर्णयामुळे पाडोळी गणातील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे