Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेकोत्सव’ तंत्रज्ञान अंकाचे प्रकाशन

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेकोत्सव’ तंत्रज्ञान अंकाचे प्रकाशन

0 6 7 8 4 1

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेकोत्सव’ तंत्रज्ञान अंकाचे प्रकाशन

धाराशिव : तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने ‘टेकोत्सव – टेक डायजेस्ट (नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६)’ या तंत्रज्ञान विषयक मॅगझिनचे प्रकाशन उत्साहात पार पडले. तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या घडामोडी, विद्यार्थ्यांचे संशोधन व विविध उपक्रमांचा आढावा या अंकातून मांडण्यात आला आहे.
या मॅगझिनचे प्रकाशन ट्रस्टच्या मानव संसाधन अधिकारी सौ. अनुराधा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्टिफाईड पॉश ट्रेनर ऋता पंडित प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने तसेच विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.‘टेकोत्सव’ या अंकामध्ये विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी पूर्ण केलेल्या इंडस्ट्रियल कोर्सेस, टेक्निकल सर्टिफिकेशन्स, इंटर्नशिप्स आणि इंडस्ट्रियल विजिट्स यांचा संक्षिप्त आढावा देण्यात आला आहे. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), लिनक्स सर्टिफिकेशन, सायबर सिक्युरिटी आणि पायथन प्रोग्रॅमिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयांवरील उपक्रमांची माहितीही या अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. विभागात आयोजित विविध तांत्रिक स्पर्धांचे अहवाल आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीचाही आढावा या अंकातून घेण्यात आला आहे.हा सर्वांगसुंदर अंक तयार करण्यासाठी प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी मागील चार महिन्यांतील विभागातील विविध कार्यक्रमांचा अभ्यास करून आकर्षक संकलन सादर केले आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी संशोधन, प्रकल्प, नवकल्पना आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या संलग्नतेमध्ये अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञान प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमास प्रा. एस.जी. शिंदे, प्रा. एस.जी. अघोर, प्रा. एन.व्ही. भोसले, प्रा. व्ही.सी. मैंदर्गी, प्रा. व्ही.ए. डावरे, प्रा. डी.बी. ठाकूर, प्रा. डी.व्ही. हराळकर, प्रा. ए.डी. बोरकर, प्रा. ए.आर. देशपांडे, प्रा. व्ही.एस. बोंदर, प्रा. एस. इंगळे आदी प्राध्यापक उपस्थित होते.तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हारदादा पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे यांनी ‘टेकोत्सव टेक्निकल डायजेस्ट’ला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांची परंपरा पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे