Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय;येडशी ॲट्रॉसिटी प्रकरण खोट्या गुन्ह्याचा फास-ॲड. विशाल साखरे यांच्या युक्तिवादाला न्यायालयाची दाद !

फिर्यादीच्या विलंबित तक्रारीवर प्रश्नचिन्ह !

0 7 6 4 8 6

फिर्यादीच्या विलंबित तक्रारीवर प्रश्नचिन्ह !

धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी

येडशी येथे घडलेल्या कथित एट्रोसिटी व मारहाण प्रकरणातील आरोपीस धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६९/२०२५ कलम यू/एस एस ११५,११८(१),१८९(२),१९१(२)(३),१९०,३३३ बीएनएस तसेच ॲफ बीएनएस. ॲन्ड यू/एस ३(१)( आर)(एस) ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंद करण्यात आली होती. फिर्यादीने दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी घटना घडल्याचे सांगितले असले तरी गुन्हा मात्र १८ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला.

या संदर्भात बचाव पक्षाच्या वतीने ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर करताना, “खरोखर घटना घडली असती तर फिर्यादीने तात्काळ तक्रार दाखल केली असती, मात्र तक्रारीस आठ दिवसांचा विलंब झाल्याने हा गुन्हा खोटा असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते,” असा मुद्दा मांडला. तसेच मारहाणीचा कोणताही प्रकार फिर्यादीसोबत घडलेला नसल्याचेही त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.

ॲड.विशाल साखरे यांनी मांडलेल्या युक्तिवादाला मान्यता देत माननीय जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना. मंजुषा साखरे,ॲड.महेश लोहार,ॲड. शुभम तांब,ॲड.अर्चना कांबळे,ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड. अमित गोळे,ॲड.उदय आडेकर, ॲड.संकेत गोरे,ॲड.ओंकार कोरेगावकर,महेश पवार, पृथ्वीराज खोचरे व रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.

3.7/5 - (3 votes)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे