ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात गणेश कांबळेंची जोरदार चर्चा
शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात गणेश कांबळेंची जोरदार चर्चा
0
6
7
8
4
1
शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात गणेश कांबळेंची जोरदार चर्चा

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा अधिक भक्कम करण्यासाठी शिवसेना शाखाप्रमुख गणेश लक्ष्मण कांबळे यांची नावीन चर्चा जोर धरू लागली आहे. गोरगरिबांच्या प्रश्नांवर तातडीने धावून जाणारे, मनमिळावू स्वभावाचे आणि राजकारणावर उत्तम पकड असलेले नेतृत्व अशी गणेश कांबळे यांची ओळख असून गावोगावी त्यांच्या नावाला मागणी वाढत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीत सदस्य आणि पाच वर्षे उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी लोकसेवेची नाळ थेट जनतेशी जोडून ठेवली. कोणाच्याही अडचणीवर तत्परतेने उपाय शोधणारा, संघर्ष करणारा असा त्यांचा लोकाभिमुख कारभार आजही गावकऱ्यांच्या चर्चेत आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीत गणेश कांबळे यांच्या जागी दुसऱ्याला तिकीट देण्याची शक्यता व्यक्त होताच, महाविकास आघाडीची ही जागा हातातून जाण्याची शक्यता लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. “गाव वनवे करणार… कांबळेंनाच तिकीट मिळाले पाहिजे” अशा स्वरात ग्रामस्थांची कुजबुज ऐकू येत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी गणेश कांबळे हे सर्वाधिक सक्षम, जमिनीशी जोडलेले आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असल्याचा स्थानिकांचा ठाम विश्वास आहे. “निवडणूक लढवली तर विजय निश्चित” असा सूर कार्यकर्त्यांपासून सामान्य जनतेपर्यंत उमटताना दिसत आहे.यामुळे शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघात गणेश कांबळे यांच्या नावाभोवती पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे.
0
6
7
8
4
1



