ब्रेकिंगमहाराष्ट्र
ऑनलाईन फसवणुकीतील १.५४ लाखांची रक्कम परत; सायबर पोलिसांची तत्पर कारवाई
ऑनलाईन फसवणुकीतील १.५४ लाखांची रक्कम परत; सायबर पोलिसांची तत्पर कारवाई

0
6
7
8
4
1
ऑनलाईन फसवणुकीतील १.५४ लाखांची रक्कम परत; सायबर पोलिसांची तत्पर कारवाई
धाराशिव : चुकीच्या स्कॅनरवर पैसे पाठवल्यामुळे फसवणुकीस बळी पडलेल्या तक्रारदारास सायबर पोलिसांनी तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देत दिलासा दिला आहे. या कारवाईबद्दल तक्रारदाराने सायबर पोलिसांचे आभार मानले आहेत.

याबाबत माहिती अशी की, पूनम दिपक दंडनाईक (रा. किणी, ता. जि. धाराशिव) यांनी दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी धाराशिव येथील आडत बाजारात सोयाबीन विक्री केली होती. व्यवहारादरम्यान ग्राहकाला पैसे पाठवताना चुकून त्यांनी चुकीच्या स्कॅनरवर १ लाख ५४ हजार रुपये पाठवले. संबंधित अज्ञात क्रमांकावर संपर्क साधला असता त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवली. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्याने तक्रारीची दखल घेत संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून अज्ञात खात्याची माहिती मिळवली. तक्रार वेळेत केल्यामुळे संबंधित खात्यातील रक्कम फ्रिझ करण्यात आली.
यानंतर न्यायालयीन आदेश प्राप्त करून बँकेला सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने दि. १७ मार्च २०२६ रोजी तक्रारदाराची १.५४ लाख रुपयांची रक्कम परत मिळाली.ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस हवालदार गाडे, पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांनी केली.दरम्यान, कोणतीही ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग झाल्यास नागरिकांनी त्वरित १९३० या हेल्पलाईनवर किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0
6
7
8
4
1



