ब्रेकिंगमहाराष्ट्र
आई तुळजाभवानीच्या नगरीत प्रामाणिकतेचा आदर्श; पुजाऱ्याने भाविकांचे १० हजार रुपये केले परत
आई तुळजाभवानीच्या नगरीत प्रामाणिकतेचा आदर्श; पुजाऱ्याने भाविकांचे १० हजार रुपये केले परत

0
7
6
4
8
6
आई तुळजाभवानीच्या नगरीत प्रामाणिकतेचा आदर्श; पुजाऱ्याने भाविकांचे १० हजार रुपये केले परत
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान नगरीत प्रामाणिकतेचा आदर्श घालून देणारी घटना घडली आहे. देवीचे पुजारी सुशांत बाळासाहेब भोसले यांनी भाविकांची चुकून राहिलेली पिशवी आणि त्यातील १० हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत करून मानवतेचे दर्शन घडवले.मोहा ता. परळी, जि. बीड येथील बाळासाहेब मारुती कांबळे हे कुटुंबासह कुलधर्म-कुलाचारासाठी तुळजापुरात आले होते. पूजा विधी व जेवणानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले; मात्र त्यांची पैशांची पिशवी पुजारी भोसले यांच्या घरीच राहून गेली.

घराची साफसफाई करताना ही पिशवी लक्षात आल्यानंतर भोसले कुटुंबाने तात्काळ संबंधित भाविकांशी संपर्क साधला. त्यानंतर पिशवीतील १० हजार रुपये जी-पे द्वारे परत करण्यात आले.दरम्यान, वाढत्या फसवणुकीच्या घटनांमध्ये तुळजापुरातील या प्रामाणिक कृतीमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुजारी सुशांत भोसले यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
7
6
4
8
6



