Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आढळलेल्या अनोळखी वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू;ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन !

0 7 6 4 8 7

तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आढळलेल्या अनोळखी वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू;ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर-लातूर एन एच ३६१ मार्गावरील काक्रंबा शिवारात दि.०३ नोव्हेंबर रोजी एक अनोळखी वयोवृद्ध पुरुष (वय अंदाजे ८० वय वर्ष चक्कर येऊन रस्त्यालगत पडलेले अवस्थेत आढळले होते. तुळजापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यास उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल,सोलापूर येथे हलविले मात्र उपचारादरम्यान दि.०९ नोव्हेंबर रोजी सायं.७:४५ वाजता त्या इसमाचा मृत्यू झाला.

सदर घटनेची नोंद तुळजापूर पोलिसांत आ.मृ.क्र.१०४/२०२५, कलम-१९४ भा.ना.सु.संहिता २०२३अन्वये करण्यात आली आहे. डॉ.जोसेफ चार्स वैद्यकीय अधिकारी,श्री छत्रपती शिवाजी महाराज सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर यांच्या खबर जबाबावरून पुढील तपास सुरू आहे.

मयत इसमाचा तपशील पुढीलप्रमाणे :

▪️लिंग: पुरुष
▪️वय: अंदाजे 80 वर्षे
▪️रंग: काळा सावळा
▪️उंची: अंदाजे 166 सेमी
▪️अंगावरचे कपडे: निळ्या रंगाचा शर्ट
▪️दाढी-मिशी: वाढलेली, पांढरी
▪️केस: काळे-पांढरे
▪️चेहरा: लांब
▪️हात-पाय: शाबुत

अनोळखी मृतदेहाचा फोटो पोलिसांकडे उपलब्ध आहे. अद्याप त्याची कोणतीही ओळख पटलेली नाही.तो कुठला रहिवासी आहे.नातेवाईक कोण आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

तुळजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय एस.थोटे यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थागुशा धाराशिव तसेच सर्व पोलीस पाटील व ताबे पोलिसांना आवाहन केले आहे की,मिसिंग रजिस्टर तपासून आणि हद्दीत शोध मोहीम राबवून मृत इसमाची ओळख पटवावी व प्राप्त माहिती तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात कळवावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे