Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सलगरा दिवटीत महाविकास आघाडीचा निर्धार; ॲड. ढवळे रामचंद्र दौलतराव यांना मिळतोय जनतेचा वाढता पाठिंबा

काक्रंबा गटात परिवर्तनाची लाट; ॲड. ढवळे यांना वाढता पाठिंबा

0 7 6 4 8 6

तुळजापूर | आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेत काक्रंबा जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार ॲड. ढवळे रामचंद्र दौलतराव यांच्या प्रचाराचा नारळ फोडत विजयाचा निर्धार करण्यात आला. सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने परिसरात निवडणुकीची रंगत वाढली आहे.या सभेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या विकासाभिमुख धोरणांवर ठाम भूमिका मांडली. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांसाठी रोजगार आणि महिलांसाठी सन्मानजनक संधी निर्माण करणे हीच आघाडीची खरी दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना ॲड. ढवळे रामचंद्र दौलतराव यांनी जनतेच्या विश्वासावरच राजकारण उभे असते. पारदर्शक कारभार, प्रामाणिक सेवा आणि गावागावात विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. काक्रंबा गटाचा विकास हाच माझा अजेंडा असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि अभ्यासू नेतृत्वामुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.सभेला पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार पांडगळे उमेश रमेश आणि फुलमाळी शामसुंदर दत्तात्रय यांनीही उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, निष्ठावंत शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या यशस्वी आयोजनामुळे काक्रंबा जिल्हा परिषद गटात ॲड. ढवळे रामचंद्र दौलतराव यांच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला असून, महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे