ब्रेकिंगमहाराष्ट्र
खेड शिवारात अफूची अवैध लागवड उध्वस्त; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
खेड शिवारात अफूची अवैध लागवड उध्वस्त; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
7
6
4
8
6
धाराशिव : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने खेड (ता. धाराशिव) शिवारात अफूच्या अवैध लागवडीवर मोठी कारवाई करत तब्बल १२ लाख ३३ हजार ४५० रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी चार शेतकऱ्यांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १७ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार टास्क फोर्सच्या पथकाने खेड येथील शेत गट क्रमांक १४९, १४२, १५३ व ९७४ मध्ये छापा टाकला. या ठिकाणी अफूच्या झाडांची अवैधरित्या लागवड करून त्यांची देखभाल केली जात असल्याचे आढळून आले. छाप्यात ८३ किलो वजनाची अफूची झाडे, फुले व बोंडे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी लिंबराज पांडुरंग लोमटे, रामहारी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे व ज्ञानेश्वर वसुदेव टकले (सर्व रा. खेड) यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजीत टिके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे व पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दरम्यान, युवक वर्ग नशेच्या विळख्यात अडकू नये यासाठी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे टास्क फोर्सने स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
7
6
4
8
6



