Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज!

घड्याळाचाच नगराध्यक्ष निवडून आणणार!— तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशींचा निर्धार

0 7 6 4 8 7

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सज्ज!

घड्याळाचाच नगराध्यक्ष निवडून आणणार!— तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशींचा निर्धार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीचा रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकविण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

कृषी मंत्री तसेच धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता मामा भरणे यांनी स्पष्ट केले की,युतीबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. युती झाली तर आपण आदेश पाळू, अन्यथा स्वतंत्रपणे लढायलाही सज्ज आहोत.

दरम्यान, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले — युती सन्मानपूर्वक झाली तर एकत्र लढू; अन्यथा स्वबळावर नगरपरिषद काबीज करू. कृषी मंत्री दत्ता मामांना शब्द दिला आहे. या वेळी तुळजापूर नगरपरिषदेत घड्याळाचाच नगराध्यक्ष निवडून आणू!

कृषी मंत्री भरणे यांच्या तुळजापूर आगमनावेळी शहरात पक्ष कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. या वेळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, शहराध्यक्ष नितीन रोचकरी, विकी घुगे, सचिन मंकराज, महेश वारुळे, गोविंद शिंदे, गोविंद देवकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

या घोषणेने तुळजापूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून “घड्याळाचा नाद” पुन्हा एकदा नगरपरिषदेत घुमणार, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.

 

इतिहास साक्षी आहे — सन
२००६ मध्ये १४ नगरसेवक, २०११ मध्ये १९ नगरसेवक,तर २०१६ मध्ये १५ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या झोळीत गेले होते.सलग दहा वर्षांहून अधिक काळ तुळजापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व टिकवून राहिले.

आता २०२५ मध्ये पुन्हा एकदा “घड्याळाचा नगराध्यक्ष” बसवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.तुळजापूरच्या राजकारणात ‘घड्याळ’ पुन्हा ठोके मारणार यात काय शंका नाही!

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 4 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे