Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवची चमक; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार राज्यात तिसरे

कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श; धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला

0 6 7 8 4 1

कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श; धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवची चमक; जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार राज्यात तिसरे

धाराशिव, ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाअंतर्गत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या मूल्यमापनात धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांनी प्रभावी नेतृत्व करत जिल्ह्याला गौरवास्पद स्थान मिळवून दिले आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून झालेल्या या स्पर्धात्मक मूल्यमापनात धाराशिव जिल्ह्याने २०० पैकी १८५.२५ गुण प्राप्त केले असून, हे मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.या कार्यक्रमांतर्गत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिककेंद्रित करण्यासाठी विविध ई-गव्हर्नन्स उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. ऑनलाईन सेवा प्रणालींचे बळकटीकरण, तक्रार निवारण प्रक्रियेतील गती, वेळबद्ध निर्णय प्रक्रिया, कार्यालयीन शिस्त, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच नागरिकांना सुलभ व तत्पर सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला.मा.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली. या यशात अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांचे योगदान महत्त्वाचे आहे.या कामगिरीमुळे धाराशिव जिल्ह्याची राज्यस्तरावर सकारात्मक प्रतिमा अधिक दृढ झाली असून, भविष्यातही नागरिकांना जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दिशेने प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 8 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे