ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
“तुळजापूरात अवैध बंदुका, ड्रग्सचा सुळसुळाट; पोलिसांची ‘सौम्य’ कारवाई की दुर्लक्ष?- सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांचा थेट आरोप”
“वाल्मीक कराडवृत्ती”

0
7
6
4
9
7
“तुळजापूरात अवैध बंदुका, ड्रग्सचा सुळसुळाट; पोलिसांची ‘सौम्य’ कारवाई की दुर्लक्ष?- सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांचा थेट आरोप”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या बाळगलेल्या बंदुका व रिव्हॉल्व्हर जप्त करण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात साळुंके यांनी नमूद केले आहे की, यापूर्वीही पोलिस प्रशासनाने काही वेळा अवैध शस्त्रांसह आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र तुळजापूर परिसरात अवैध धंद्यांतून आलेल्या पैशामुळे “वाल्मीक कराडवृत्ती” वाढत असून, त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. विशेषतः तरुण मुलींना रोडरोमिओ, गुंडगिरी व नाहक त्रासाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पोलिस प्रशासन कारवाई करत नसल्याचा किंवा कारवाई झालीच तर ती अत्यंत सौम्य स्वरूपाची असल्याचा आरोपही साळुंके यांनी केला आहे. तुळजापूर पोलीस ठाणे हे खल रक्षणाय ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ड्रग्स व्यवसायासंदर्भातही पोलिस प्रशासनाकडे तसेच संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ व गुंडगिरी यावर तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांची स्वाक्षरी असून, प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

0
7
6
4
9
7



